📢 प्रायोजित जाहिरात (Sponsored Ad)
सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ 🏛️ Affiliated with Central Press Journalist Association
⚡ ब्रेकिंग
Central Press Journalist Association
🏛️ Official Media Affiliation | अधिकृत संलग्नता Metro City Mumbai हे "Central Press Journalist Association (केंद्रीय पत्रकार संघ)" शी संलग्न आहे.
14:30
5G
Metro City Mumbai
मेट्रो सिटी मुंबई
METRO CITY MUMBAI NEWS
मुख्यपृष्ठ
Mumbai ⏱️ वाचन वेळ: २ मि.

रोहिदास नगरातील संत रोहिदास समाज मंदिराचे होणार नूतनीकरण; आमदार अनंत नर यांच्या निधीतून विकासकाम

Kasalkar Insights
📢 प्रायोजित जाहिरात (Advertisement)

विशेष वृत्त: संदिप कसालकर

जोगेश्वरी (पूर्व) : जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील रोहिदास नगर येथील संत शिरोमणी रोहिदास समाज मंदिराच्या नूतनीकरणाचे काम आमदार अनंत (बाळा) नर यांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या विकासकामामुळे समाज मंदिराचा कायापालट होण्यास मदत होणार असून, समाजबांधवांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समाज मंदिर हे सामाजिक, सांस्कृतिक आणि सामुदायिक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असते. त्यामुळे या मंदिराच्या नूतनीकरणामुळे परिसरातील समाजबांधवांना विविध कार्यक्रम, बैठका आणि सामाजिक उपक्रमांसाठी अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. आमदार निधीतून होणाऱ्या या कामामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्यासही मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला विधानसभा प्रमुख सुगंधा शेट्टये, नगरसेविका लोना रावत, विधानसभा समन्वयक रविंद्र साळवी, उपविभाग प्रमुख दिलीप साटम, शाखा प्रमुख नंदकुमार ताम्हणकर, शाखा समन्वयक अंकुश मोरवेकर, साक्षी पाडावे, तुषार सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रोहिदास नगरातील या समाज मंदिराच्या नूतनीकरणामुळे परिसरातील समाजबांधवांना अधिक सुविधायुक्त जागा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, या विकासकामाकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)