मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे आणि सौंदर्यीकरण प्रकल्पांचे दिमाखात लोकार्पण

अक्षर आकार:


विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर । मेट्रो सिटी मुंबई

खासदार रवींद्र वायकर यांच्या खासदार निधीतून साकारले विविध लोकोपयोगी प्रकल्प; २०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप

मुंबई: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांच्या खासदार निधीतून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात साकारण्यात आलेल्या विविध अभिनव विकासकामांचे आणि सौंदर्यीकरण प्रकल्पांचे लोकार्पण शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. या विकासकामामुळे जोगेश्वरी परिसराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली आहे.


स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य देत या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नागरिकार्पण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकल्पांचा समावेश आहे:

  • अत्याधुनिक प्रसाधन गृह आणि सेवा केंद्र: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रोमा मनपा केअर रुग्णालयाजवळ रुग्णांचे नातेवाईक व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

  • सांस्कृतिक भिंतीचित्रे: परिसराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी संत परंपरेची महती सांगणारी आकर्षक भिंतीचित्रे साकारण्यात आली आहेत.

  • सोलर वीज निर्मिती प्रकल्प: श्याम नगर तलाव व इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात 'सूर्य घर' योजनेच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, यामुळे शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन मिळून विजेची बचत होण्यास मदत होईल.

  • मेट्रोच्या आकाराचे वाचनालय: दुर्गा नगर येथील एम.एम.आर.डी.ए. कॉलनीजवळ विद्यार्थ्यांसाठी हे अभिनव वाचनालय उभारण्यात आले आहे.

  • मोफत सायकल वाटप: सामाजिक दायित्व जपतानाच इयत्ता आठवी ते बारावीमधील २०० होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुकर होणार आहे.

  • नवीन पाणपोई: शहीद विजय साळसकर उद्यानाजवळ प्रवाशांची व स्थानिकांची तहान भागवण्यासाठी नवीन पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

या लोकार्पण सोहळ्यात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार रवींद्र वायकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. "रवींद्र वायकर हे जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडले गेलेले नेतृत्व असून, त्यांनी खासदार निधीचा अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी वापर करून सर्वसमावेशक विकास साधला आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


 या कार्यक्रमास उपनेते दिलीप शिंदे, रचना सावंत, राजुल पटेल, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, प्रियांका आंबोळकर, राजू पेडणेकर, स्वप्नील टेंबवलकर, अल्ताफ पेवेकर, विष्णू सावंत, आत्माराम चाचे, मनीषा वायकर, रेखा रामवंशी, दीप्ती वायकर-पोतनीस, प्राजक्ता वायकर-महाले, पूजा शिंदे यांच्यासह विविध शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या बहुविध प्रकल्पांमुळे जोगेश्वरी परिसराचा विकास अधिक गतिमान झाला आहे.

Metro City Mumbai

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)