मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

आमदार अनंत (बाळा) नर आणि उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या उपस्थितीत 'जय जवान' पथकाचा गौरव: जोगेश्वरीच्या शिलेदारांनी प्रो गोविंदा स्पर्धेत गाजवले मैदान!

अक्षर आकार:

विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर 

जोगेश्वरीच्या मातीतील अस्सल शिस्त, सांघिक एकता आणि जिद्दीचा गड पुन्हा एकदा दुमदुमला आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या 'जय जवान गोविंदा पथकाने' यंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आपल्या घाम आणि कष्टाच्या जोरावर या पथकाने जोगेश्वरीचा मान पुन्हा एकदा उंचावला असून, त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

या उल्लेखनीय यशाची दखल घेत आमदार अनंत (बाळा) नर आणि शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांनी जय जवान गोविंदा पथकाची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी सर्व गोविंदांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत पथकातील गोविंदांना 'सेफ्टी किट' देखील सुपूर्द करण्यात आले. मिळालेला दुसरा क्रमांक हा शेवट नसून, पुढील वर्षाच्या महाविजयाची ही एक नवी आणि दणदणीत सुरुवात आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

येत्या वर्षी आणखी जोमाने, अफाट जिद्दीने आणि नव्या उमेदीने सराव करून मुख्य विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी जय जवान पथक आतापासूनच कामाला लागले आहे. खेळाडूंचा हा उच्चांकी उत्साह पाहता, आगामी स्पर्धांमध्ये हे पथक आणखी मोठी कामगिरी करेल यात शंका नाही.

या प्रेरणादायी सोहळ्यात परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विश्वनाथ सावंत, कैलासनाथ पाठक, लोना रावत, संदीप कोठारकर, प्रदीप गांधी, नंदकुमार ताम्हणकर, रश्मी गोडांबे, मानसी गोडांबे, अथर्व कदम, सुनील बागवे, योगीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.

Kasalkar Insights

Sandeep Kasalkar's career is characterized by a relentless pursuit of journalistic excellence and a deep commitment to diverse storytelling. Whether through ground reporting, editorial leadership, or advocacy, he continues to make significant contributions to the media landscape. His multifaceted expertise and leadership are instrumental in shaping and advancing the field of journalism in India.

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)