मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

नगरसेविका लोना रावत यांचा 'क्लीन प्रभाग ७३' संकल्प! आमदार अनंत (बाळा) नर यांच्या उपस्थितीत मोठ्या कचरा डब्यांचे भव्य वाटप!

अक्षर आकार:

वृत्तांकन: संदिप कसालकर । मेट्रो सिटी मुंबई न्यूज

जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी अहोरात्र ग्राउंडवर धावणार्‍या प्रभाग क्रमांक ७३ च्या लोकप्रिय नगरसेविका लोना रावत यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभागात स्वच्छतेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. नगरसेविका निधी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी मोठ्या कचऱ्याच्या डब्यांचे भव्य वाटप अत्यंत उत्साहात पार पडले.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला आमदार अनंत (बाळा) नर यांनी विशेष उपस्थिती लावून नगरसेविका लोना रावत यांच्या लोककल्याणकारी कामांचे भरभरून कौतुक केले आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवा हुरूप भरला.

आपला प्रभाग मुंबईत आदर्श आणि कचरामुक्त बनवायचा, याच एका ध्येयाने नगरसेविका लोना रावत यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी उचललेले हे पाऊल स्थानिक रहिवाशांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.

या प्रसंगी बोलताना, नगरसेविका लोना रावत यांनी उपलब्ध करून दिलेल्या या कचरा डब्यांचा स्थानिक नागरिकांनी योग्य वापर करावा आणि आपल्या घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या मोहिमेत सक्रीय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. 'जनतेच्या मूलभूत गरजा आणि सोयी-सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे हेच आपले सर्वोच्च कर्तव्य आहे,' हाच दृढ विश्वास या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

या ऊर्जेने भरलेल्या भव्य कार्यक्रमाला अनेक प्रमुख चेहऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये:

विश्वनाथ सावंत (माननीय विधानसभा प्रमुख)
दिलीप साटम (उपविभाग प्रमुख)
प्रदीप गांधी (शाखा प्रमुख)
सुचित्रा चव्हाण (महिला शाखा संघटिका)

यांच्यासह सर्व सन्माननीय उपशाखा प्रमुख, गट प्रमुख आणि प्रभाग ७३ मधील शेकडो सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका लोणा रावत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा 'स्वच्छता पॅटर्न' सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे!

Metro City Mumbai

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)